महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत भाजपा महिला मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न


- महिला सशक्तीकरणासोबत संघटनवाढीवर भर द्यावा - श्रीमती अल्काताई आत्राम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा.आमदार चित्राताई वाघ यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आयोजित जिल्हा कार्यकारिणी बैठक आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, महिला कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग वाढविणे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी अल्काताई आत्राम भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री तथा विदर्भ प्रदेश प्रभारी मा. अल्काताई आत्राम यांनी उपस्थित महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महिला सशक्तीकरण, संघटनवाढ आणि आगामी काळातील कार्ययोजना याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन करत महिलांनी आत्मविश्वासाने प्रत्येक क्षेत्रात पुढे येऊन पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करण्यासाठी प्रभावीपणे कार्य करावे, असे आवाहन केले.

महिला आता कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला प्रत्येक क्षेत्रात सक्षमपणे काम करत आहेत. पक्षाचे पद स्वीकारल्यानंतर कोणत्याही प्रकारचा वादविवाद किंवा भेदाभेद न करता पक्षहिताला प्राधान्य देत संघटनेचे काम सातत्याने करावे. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे प्रतिपादन अल्काताई आत्राम यांनी केले. तसेच धर्मरक्षा २०२६ या विषयावर संवादाचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड करावा, तसेच शेतकरी महिला व शेतमजूर महिलांना  शेतकरी महिला’ म्हणून राज्य शासनाकडून प्रमाणपत्र मिळणार असल्याने शेतकरी महिलांपर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती देण्यात यावी.असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी महिला कार्यकर्त्यांनी संघटनात्मक कामात सक्रिय राहून पक्षाचा जनाधार अधिक मजबूत करण्यासाठी तळागाळात प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यात महिला कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी महिला मोर्चाच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांशी सातत्याने संपर्क वाढवून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर भर देण्याचे आवाहन केले. शासनाच्या या कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र महिलांना मिळवून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत बूथस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत महिला संघटना अधिक सक्षम करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. आगामी काळात संघटनात्मक कार्यक्रम प्रभावीपणे राबवून पक्षाची विचारधारा आणि विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

बैठकीला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे, ज्येष्ठ नेते तथा संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या पुणे इंजि.प्रमोदजी पिपरे,भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री तथा विदर्भ प्रदेश प्रभारी मा. अल्काताई आत्राम, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.योगिताताई पिपरे,नगराध्यक्ष अ‍ॅड. प्रणोती निंबोरकर, ज्येष्ठ नेत्या सौ.रेखाताई डोळस, भाजपा प्रदेश सदस्य डॉ. चंदाताई कोडवते, जिल्हा प्रभारी तथा जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके, माजी जि.प. अध्यक्षा सौ. योगिताताई भांडेकर, जिल्हा महामंत्री सौ. लताताई पुन्घाटे,  अर्चनाताई बोरकुटे, प्रीतीताई शंभरकर, शालिनीताई पोहणेकर, भाजपा चामोर्शी तालुका अध्यक्ष श्रीमती रोशनीताई वरघंटे,शहराध्यक्ष तथा न.प. सभापतीसीमा कन्नमवार, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष कविता किरमे,किरण चचाने, नीता ढोरे, अर्चना ढोरे यांच्यासह महिला मोर्चाच्या विविधपदाधिकारी,नगरसेविका व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बैठकीत आगामी संघटनात्मक कार्यक्रम, महिला मोर्चाच्या माध्यमातून तळागाळात पक्षाचा जनाधार मजबूत करणे, महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे तसेच बूथस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत महिला कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महिला मोर्चाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांतील महिलांशी सातत्याने संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे, शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणे आणि पक्ष संघटनेला अधिक व्यापक स्वरूप देण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

बैठकीचे प्रास्ताविक भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका योगिताताई पिपरे यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा महामंत्री अर्चनाताई बोरकुटे यांनी केले, तर आभार जिल्हा महामंत्री लताताई पुन्घाटे यांनी मानले.या बैठकीमुळे भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात महिला संघटनेच्या माध्यमातून पक्षाचे विचार, ध्येयधोरणे, शासनाच्या लोककल्याणकारी योजना आणि विकासाभिमुख कार्य जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.





  Print






Related Photos