महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात साजरा


- जे. एस. पी. एम. महाविद्यालयात विविध उपक्रम; स्वच्छता अभियानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / धानोरा : स्थानिक जे. एस. पी. एम. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्थापना दिवस गुरुवार, २४ सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी, स्वच्छता आणि समाजसेवेचा संदेश दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ. वीणा जंबेवार होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. गणेश चौधरी, डॉ. संजय मुरकुटे, प्रा. ज्ञानेश बनसोड, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रियंक पठाडे आणि सहकार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण गोहणे उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे आणि समाजाच्या विकासामध्ये स्वयंसेवकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये एनएसएसचे महत्त्व अधोरेखित करताना सामाजिक जाणीव, स्वयंशिस्त, नेतृत्वगुण, श्रमप्रतिष्ठा आणि समाजसेवेची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना महत्त्वपूर्ण माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वच्छता अभियानातून सामाजिक संदेश -
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजनेच्या मूलभूत तत्त्वांना अनुसरून स्वच्छता अभियानाने करण्यात आली. एनएसएसचे स्वयंसेवक व स्वयंसेविकांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदान करत महाविद्यालय परिसराची स्वच्छता केली. परिसरातील कचरा, अनावश्यक वाढलेले गवत व इतर अस्वच्छता दूर करून परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यात आला.

स्वच्छता ही केवळ एका दिवसाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने दैनंदिन जीवनात स्वच्छतेची सवय अंगीकारणे आवश्यक आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत श्रमदानाचे महत्त्व अधोरेखित केले.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग -
एनएसएसच्या स्वयंसेवकांनी विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. सामाजिक प्रश्नांविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच समाजाच्या विकासासाठी विद्यार्थ्यांनी सक्रिय योगदान द्यावे, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयीन शिक्षणासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन एनएसएस स्वयंसेविका कांचन मडावी हिने केले, तर योगीता कोटवार हिने उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. हरीष लांजेवार, डॉ. पंढरी वाघ, डॉ. दामोदर झाडे, डॉ. सचिन धवनकर, नितेश पुण्यप्रेड्डिवार, डॉ. पंकज चव्हाण, प्रा. मांतेश तोंडरे, प्रा. प्रशांत वाळके, प्रा. गीता भैसारे, प्रा. सूर्यवंशी, प्रा. होमेश्वरी लाड, प्रा. मीनाक्षी खोब्रागडे, प्रा. भुरसे, प्रा. जाळे यांच्यासह एनएसएसचे स्वयंसेवक, स्वयंसेविका आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

राष्ट्रीय सेवा योजना दिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, स्वच्छतेची जाणीव आणि समाजसेवेची भावना अधिक दृढ झाली.





  Print






Related Photos