राज्यात डेल्टा प्लसच्या रूग्णांमध्ये वाढ : नागपुरात होम आयसोलेशन बंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई :
कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. दुसरी लाट ओसरत असून संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. अशातच राज्यात कोरोना रूग्णांची संख्या काही प्रमाणात वाढताना दिसत आहे. राज्यात कोरोनाचा वेरिएंट डेल्टा प्लसचे रूग्ण सापडत आहेत. तर नागपूरात डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. डेल्टा प्लसच्या रूग्णांची नोंद होत असल्याचे लक्षात आल्यावर नागपुरात होम आयसोलेशन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रूग्णाला संस्थात्मक विलगीकरणात जावे लागणार आहे. किंवा त्या व्यतिरीक्त रूग्णाला रूग्णालयात दाखल व्हावे लागेल.
या संदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेश जारी केले आहेत. सर्व झोन आयुक्तांना यासंदर्भात सूचना जारी करण्यात आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या सध्या आटोक्यात असली तरी 'डेल्टा प्लस'चा धोका कायम आहे. पॉझिटिव्ह आल्यानंतर संबंधित रुग्ण डेल्टा प्लसचा रुग्ण असू शकतो, ही शक्यता लक्षात घेता त्याच्यापासून विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे. 
  Print


News - Nagpur | Posted : 2021-08-27Related Photos