महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या.पुणेचे नवनिर्वाचित संचालक इंजि. प्रमोदजी पिपरे यांचा सत्कार


- ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते सत्कार; सहकार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणेचे तथा गडचिरोली जिल्हा सहकारी मंडळ मर्या. गडचिरोलीचे नवनिर्वाचित संचालक इंजि. प्रमोदजी पिपरे यांचा ज्येष्ठ सहकार नेत, सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी इंजि.प्रमोदजी पिपरे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
गडचिरोली जिल्हा सहकारी मंडळ मर्या. गडचिरोली संस्थेच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीची सभा नुकतीच संस्थेच्या कार्यालयात पार पडली. या निवडणुकीत जिल्हा सहकारी मंडळाच्या अध्यक्षपदी अनंत साळवे, तर उपाध्यक्षपदी किशोर गुरमवार यांची अविरोध निवड झाली.
नवनियुक्त संचालक मंडळ व पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी जिल्हा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा ईशा पोरेड्डीवार तसेच संस्थेचे नवनिर्वाचित संचालक इंजि. प्रमोद पिपरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अतुल गण्यारपवार, संस्थेचे नवनिर्वाचित संचालक भरत नेवारे, वसंत मेश्राम, श्रीहरी भंडारी, डॉ. दुर्वेश भोयर, खिल्लेसागर नाकाडे, गिरीश नरड, जगदीश कन्नाके, तानाजी भुरसे, बंडू ऐलवार, नेत्रा साळवे, सोनल पेटकार यांच्यासह ए.वाय. हुकरे, अभ्यास अधिकारी व जिल्हा सहकारी विकास अधिकारी तलमले उपस्थित होते.
इंजि. प्रमोदजी पिपरे यांच्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालकपदी झालेल्या निवडीमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राला प्रतिनिधित्व मिळाले असून, त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या विकासाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.




Petrol Price




