अतिधोकादायक इमारतींना महानगरपालिकाद्वारे नोटीस : स्थलांतरीत होण्याचे आवाहन
- ७ इमारती पाडण्यात आले.
विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील १५ इमारती या अतिधोकादायक वर्गातील असुन त्यातील ७ इमारती पाडण्यात आले आहेत तर उर्वरित सर्व धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना महापालिकेतर्फे घर सोडुन त्वरीत स्थलांतरीत करण्याची अंतिम नोटीस देण्यात आले आहे.
नोटीस अंतर्गत सदर इमारत शिकस्त व जीर्ण झाल्याचे नमुद असुन इमारतीत वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनी अन्य सुरक्षीत स्थळी त्वरीत स्थलांतरीत होण्याचे बजाविण्यात आले आहे. झोन क्र. १ अंतर्गत ६, झोन क्र. २ अंतर्गत ८ तर झोन क्र. ३ अंतर्गत १ इमारत अतिधोकादायक आहेत. या सर्व इमारतींना ३० वर्षापेक्षा ज्यास्त कालावधी झालेला आहे. यातील ७ इमारती पाडण्यात आले आहेत तर उर्वरितांना घरे रिकामी करण्याच्या २ नोटीस यापुर्वी व आता अंतिम नोटीस देण्यात आली आहे.
महानगरपालिका हद्दीतील बापट नगर, नगिनाबाग, नागपूर रोड, गौतम नगर, रामाला तलावाजवळील १ व मिलन चौक येथील २ इमारती असे एकुण ७ अतिधोकादायक इमारती पाडण्यात आलेले आहेत. पालिका प्रशासनाच्या धोरणानुसार शहर व उपनगरातील सर्व खासगी व पालिकेच्या मालकीच्या इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. त्यात ज्या इमारती तत्काळ पाडून टाकणे आवश्यक आहे. अशा अतिधोकादायक म्हणून गणले जातात. त्यानुसार या अतिधोकादायक इमारतींना नोटीस देऊन कारवाई करण्यात येणार आहे.
यापुर्वी घुटकाळा वार्ड येथील एकोरी प्रभाग क्र. १० येथील एक अतिधोकादायक इमारत कोसळून एक व्यक्ती जखमी तसेच वित्तहानीही झाली होती. अश्या प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊन जीवितहानी व वित्तहानी होऊ नये याकरीता धोकादायक इमारतींचा वापर थांबवुन तात्काळ स्थलांतरीत होण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
News - Chandrapur