चंद्रपूर : कत्तलीसाठी नेणाऱ्या १९ जनावरांची सूटका
- पडोली पोलिसांची कारवाई : दोघांना अटक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : आयचर वाहनात कोंबून कत्तलीसाठी नेणाऱ्या १९ जनावरांची सुटका करुन पडोली पोलिसांनी दोघांना अटक केली. गुरुवारी मध्यरात्री साखरवाही टोल नाक्यावर नाकाबंदी करुन पोलिसांनी ही कारवाई केली. अब्दुल अजीज अब्दुल रऊफ वय २७, जुबेर अहमद गुलाब रसूल कुरेशी वय ४० दोघेही रा. गडचांदूर असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. तर मुजममील खॉ वाहाब खॉ वय २४ रा. गडचांदूर हा फरार असून त्याचा शोध सुरु आहे. या कारवाईत सुमारे दहा लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आयचर वाहनात कोंबून कत्तलीसाठी जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती पडोली पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी लगेच साखरवाही टोल नाका येथे नाकाबंदी केली. दरम्यान संशयित वाहन आयचर क्र. एमएच 27, बी एक्स 5838 येताच पोलिसांनी वाहन थांबविले. वाहनाची तपासणी केली असता वाहनात जनावरे कोंबून दिसून आले. पोलिसांनी वाहनचालक व वाहक या दोघांना अटक केली तर सोबतच एकजण पोलिसांना पाहून फरार झाला. पोलिसांनी जनावरांसह दहा लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुनीलसिंग पवार यांच्या नेतृत्वात देवाजी निखाडे, विनोद वनकर, किशोर वाकाटे, सुमीत बरडे, प्रतिक हेमके, पकंज किटे, धिरज भोयर, कोमल मोहजे यांच्यासह पडोली पोलिसांच्या चमूने केली.
News - Chandrapur