महत्वाच्या बातम्या

 चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी केले लाखो रुपयांची चोरी


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / पुणे : इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी गावात सहा अज्ञात दरोडेखोरांनी एका कुटुंबाला हत्यारांचा धाक दाखवून ३ लाख ३३ हजारांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. चाकू लोखंडी सळई, लोखंडी जंब्या, कोयते, सत्तुर आदीचा धाक दाखवत चोरी केली आहे. कालींदा अशोक कुबडे (३९) रा. लाखेवाडी ता. इंदापूर जि. पुणे यांच्या फिर्यादीवरुन इंदापूर पोलीस ठाण्यात सहा अज्ञात दरोडेखोरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी २७ ऑक्टोबर रोजी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास अंदाजे २२ ते २५ वयाचे सहा दरोडेखोर हातामध्ये चाकू, लोखंडी सळई, लोखंडी जंब्या, कोयते, सत्तुर, वाकड़ा कोयता अशा धारदार शस्त्रासह हातात बॅटरी घेऊन फिर्यादी यांचे सासरे ज्ञानदेव सिमाराम कुबडे झोपलेल्या खोलीची आतील कडी काढून त्यांनी खोलीमध्ये घुसले.
- दुर्दैवी प्रसाद बनवताना गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, ३० जण गंभीर जखमी
ज्ञानदेव कुबडे यांच्या गळ्याभोवती लोखंडी जंब्या व डोक्यावर चाकू धरून धाक दाखवुन खोलीमध्ये ३ ट्रॅन्कमध्ये ठेवलेले ६० हजार रुपये रोख रक्कम, १ लाख लाख रूपये किमितीचे सव्वा दोन तोळ्याचे सोन्याचे गंठन, ५० हजार रुपये किमतीचे सव्वा एक तोळा वजनाचे सोन्याचा मिनी गंठन, २२ हजार रुपये किमतीची अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी, १६ हजार रूपये किमतीची चार ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, २२ हजार रूपये किमतीची कानातील दोन फुले, आठ हजार रूपये  सोन्याच्या दोन रिंगा ,५० हजार रुपये किमतीचे सव्वा तोळा वजनाचे सोन्याचे मणी व डोरले, चार हजार रुपये किमतीची नथ, दोन हजार रुपये किमतीचे पैजन व एक हजार रूपये किमतीचे पायातील चांदीचे दागीणे असा रोख रक्कमेसह ३ लाख ३३ हजार रुपये ऐवज चोरी केला.
त्यानंतर कालींदा कुबडे यांच्या बाजूला झोपलेल्या खोलीचा दरवाजास जोरात धक्का देऊन तो दरवाजा उघडला. अज्ञात सहा दरोडेखोरांना त्याच्या हातातील हत्यारांसह पाहिले असता त्यांनी आरडाओरडा केला. त्याच वेळी त्यातील दोघांनी त्यांच्या तोंडावर जोरात बुक्या मारून त्यांना जखमी केले. यासोबत घरातील इतर लोकांना हातातील हत्यारे उगारून हात्यारांचा धाक दाखवुन जिवे मारण्याची धमकी दिली. तर फिर्यादी यांचा मुलगा याचे डावे पायावर लोखडी सळईने मारून दुखापत केली. याच वेळी पती अशोक कुबडे हे कोयता घेवुन आल्याचे पाहून या दरोडेखोरांनी तेथुन पळ काढला.
सदर गुन्हाचा तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे करीत आहेत. 





  Print






News - Rajy




Related Photos