ऑक्सिजनच्या बाबतीत टास्क फोर्सने केलेल्या शिफारसींचे काय झाले? : सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला विचारणा


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था / दिल्ली :
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ऑक्सिजन पुरविण्यासंदर्भात एक टाक्स फोर्सची स्थापना कोर्टाच्या आदेशानुसार करण्यात आली होती. या टास्क फोर्सने केलेल्या शिफारसींवर कोणती पावले उचलली गेली याचा अहवाल दोन आठवड्यात सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने आज केंद्र सरकारला दिले आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा आणि ऑडिटबाबत राष्ट्रीय टास्क फोर्सनं अंतिम अहवाल सरकारकडे सुपूर्त केला आहे अशी माहिती केंद्राने कोर्टात दिली आहे. 
टास्क फोर्समध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश केला आहे. त्यामुळे या समितीने सुचविलेल्या शिफारसींवर केंद्र सरकार ठोस पावले उचलून काम करेल अशी आम्हाला आशा आहे, असे कोर्टाने म्हटले आहे. टास्क फोर्सने सादर केलाला अहवाल आणि त्यावर केंद्राने केलेल्या उपाययोजना यांचा संयुक्त अहवाल येत्या दोन आठवड्यांच्या आत सुप्रीम कोर्टासमोर सादर करावा लागणार आहे.

सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि एमआर शाह यांच्या खंडपीठानं यावरील सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवली आहे. प्रत्येक राज्यांच्या सरकारांना त्यांच्या राज्यातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत एक टास्क फोर्सची स्थापना करण्याचे आदेश याआधीच देण्यात आले होते, असं केंद्र सरकारच्या वतीने कोर्टात सांगण्यात आले आहे.
  Print


News - World | Posted : 2021-08-09Related Photos