भाजपाच्या एटापल्ली तालुका अध्यक्ष म्हणून प्रशांत आत्राम यांची निवड
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / एटापल्ली : माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचे खंदे समर्थक तथा माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच प्रशांत आत्राम यांची नुकतेच एटापल्ली ग्रामीण तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सदर निवड जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी केलेली आहे.
प्रशांत आत्राम यांच्या निवडीने एटापल्ली तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण झाली आहे. तळागाळातील जनतेला न्याय देऊ असे विश्वास नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष प्रशांत आत्राम यांनी व्यक्त केला.
News - Gadchiroli