पोलीस कर्मचाऱ्यांच्या समयसूचकतेमुळे वरोरा शहरातील मोठी दुर्घटना टळली
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वरोरा : वरोरा शहरातील एका घराला आग लागल्याची घटना उघडकीस आली. सदर घटना ८ एप्रिलला पहाटे ३:०० वाजताच्या सुमारास घडली.
माहितीनुसार वरोरा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक नजीक शेख, मुनार शेख चांद यांचे घर असून घरातील सर्व व्यक्ती झोपेत होते. वरोरा शहरातील पोलीस कर्मचारी रात्र गस्त घालित होते. त्यावेळी घरातून मोठ्या प्रमाणात धुवा निघताना कपिल भंडारवार, मोहन निषाद, रंगराव पाटील या पोलीस कर्मचाऱ्यांना दिसून आले. त्यांनी घराकडे धाव घेतले. घरातील इसम झोपेत असल्याने त्यांना आग लागल्याची माहिती नव्हती. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना उठवले दार उघडताच आग दिसून आली. घरातील कुटुंबियांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळले.
या परिसरात दाट वस्ती असून पहाटे वारा सुरू होता. त्यामुळे आग पसरले गेली असती. परंतु पोलीस कर्मचाऱ्यांनी समय सूचकता दाखविल्याने एक मोठी दुर्घटना टळली.
News - Chandrapur