शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : आदिवासी क्रांतीसुर्य स्वतंत्रता संग्रामाचे जननायक बिरसा मुंडां जयंती कार्यकम साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हेमलता चौधरी (वानखेडे) उपस्थित राहुन जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. तसेच या कार्यक्रमाला डॉ. सुनील पुनवटकर, डॉ. मंदार पैगणकर, चेतन खोब्रागडे, दत्तु दांडेकर तसेच निवडक विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित राहुन जननायक बिरसा मुंडां जयंतीचा कार्यक्रम आयोजीत करून कार्यक्रम संपन्न झाला.
News - Gadchiroli