महत्वाच्या बातम्या

 मतदान नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन


- ३ व ४ डिसेंबर २०२२ रोजी विशेष शिबिर 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२३ राबविण्यात येत आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमा अंतर्गत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ पर्यंत असून मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात दोन दिवस विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. ३ डिसेंबर २०२२ शनिवार व ४ डिसेंबर २०२२ रविवार या दिवशी जिल्ह्यातील मतदान केंद्रावर तसेच मतदार नोंदणी कार्यालयात शिबिराचे आयेाजन करण्यात येणार असून मतदान केंद्रावर मतदान केंद्र स्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos