महत्वाच्या बातम्या

 किसान विद्यालय २००५ बॅचच्या गेट-टुगेदरची सर्वत्र चर्चा : सोशल मीडियावर व्हिडिओंना उत्स्फूर्त प्रतिसाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वडसा : किसान विद्यालय, कोरेगाव येथील २००५ च्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या गेट-टुगेदर कार्यक्रमाची सध्या परिसरात आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. तब्बल २१ वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचा अनोखा सोहळा अनुभवला.

कार्यक्रमानंतर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओंना आणि छायाचित्रांना मोठा प्रतिसाद मिळत असून हजारो लोकांनी ते पाहिले आहेत. अनेक माजी विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कार्यक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत हा दिवस आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कार्यक्रमात शाळेतील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला तसेच जुन्या आठवणींना उजाळा देणारे विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुणजी राजगिरे, मुख्याध्यापक जगदीश केळझरकर, माजी मुख्याध्यापक मुंगमोडे सर, सतीश दहिवले सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गौरव नागपूरकर, कमलेश बारस्कर, रुपेश केळझरकर, संजय दाने, गीता निकोडे,  सुमंगला सहारे निराशा राजगिरे आणि शितल दहिवले यांच्यासह नियोजन मंडळातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या पुनर्भेटीमुळे जुन्या मैत्रीचे बंध अधिक दृढ झाले असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याची भावना अनेक सहभागी माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. परिसरात आणि सोशल मीडियावर या गेट-टुगेदरची चर्चा अद्यापही सुरू असून, हा कार्यक्रम मैत्रीचा एक संस्मरणीय महाकुंभ ठरल्याची भावना व्यक्त होत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos