महत्वाच्या बातम्या

 राजुरा पोलिसांनी केला दुचाकी चोरी रॅकेटचा पर्दाफाश : सात मोटारसायकलींसह दोघे जेरबंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दुचाकी चोरीच्या मालिकेचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत तब्बल २ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. साहील वसंता टेकाम व चेतन दिनेश मिलमिले दोन्ही रा. इंदिरानगर, चुनाळा असे आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर येथील भिवापूर वॉर्ड परिसरातील रहिवासी नित्युंजय आशुतोष बिश्वास (वय ५५) यांनी २५ जून रोजी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. २२ जून रोजी राजुरा तहसील कार्यालयासमोरील गेटजवळ उभी केलेली त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस क्रं एमएच ३४ वाय १४६१ ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. याप्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७२/२०२६ अंतर्गत कलम ३०३(२) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी साहील वसंता टेकाम (वय २०), रा. इंदिरानगर, चुनाळा आणि चेतन दिनेश मिलमिले (वय २१), रा. इंदिरानगर, चुनाळा या दोघांना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपींनी केवळ राजुरा येथीलच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे तसेच तेलंगणातील वांकडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या सात मोटारसायकलींपैकी काही वाहने रामनगर, कोरपना आणि वांकडी (तेलंगणा) येथील चोरीच्या गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये विविध हिरो होंडा स्प्लेंडर व स्प्लेंडर प्रो मॉडेलच्या मोटारसायकलींचा समावेश असून त्यांची एकूण किंमत सुमारे २ लाख ६३ हजार रुपये आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, अनुप डांगे, पोअं महेश बोलगोडवार, शफीक शेख, मिलिंद जांभुळे, रमेश बस्सी, शरद राठोड, राजीव दुबे यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos