भद्रावती : दोन मृत्यू प्रकरणांतून स्पष्ट : एक झोपेत मद्यप्राशनामुळे, दुसरी आत्महत्या

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / भद्रावती : शहरातील दोन वेगवेगळ्या मृत्यू प्रकरणांबाबत सुरुवातीला वेगवेगळी माहिती समोर आली होती, पण पोलिस तपासानंतर आता दोन्ही घटनांमागील कारणे स्पष्ट झाली आहेत. एका प्रकरणात अति मद्यप्राशनामुळे झोपेत मृत्यू झाला असून, दुसऱ्या प्रकरणात गळफास घेऊन आत्महत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
भटाळी वेकोलि वसाहतीत राहणारे मंगेश रामदास चहारे (३५) हे वेकोलि कोळसा खाणीमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होते. ते अविवाहित होते. शुक्रवार, १५ तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला ही घटना आत्महत्येच्या संशयाने पाहिली जात होती, मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपास आणि वैद्यकीय अहवालानुसार अति मद्यप्राशनामुळे झोपेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
दुसरी घटना आयुध निर्माणी वसाहतीत घडली. अनंता कनृजी कुमरे (वय ५२) हे आयुध निर्माणी येथे कर्मचारी होते. सुरुवातीला त्यांच्या मृत्यूला नैसर्गिक कारणाचे चित्र दिसत होते, परंतु पोलिस तपासात घरात गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.
या दोन्ही घटना एकाच रात्री घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती आणि सुरुवातीच्या गोंधळामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. पोलिस तपासानंतर आता दोन्ही घटनांमागील खरी कारणे समोर आली आहेत. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद (मर्ग) दाखल केली असून, पुढील तपास सुरू आहे.
News - Chandrapur




Petrol Price




