मंत्रालयाच्या इमारतीवरून एका तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न


- मंत्रालयाच्या इमारतीवरून प्रेम प्रकरणातून तरुणाची उडी
- आत्महत्येचा प्रयत्न, जाळीत अडक्लाने वाचला
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : या तरुणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. मात्र, मंत्रालयाला लावलेल्या संरक्षक जाळीमुळे मोठा अनर्थ टळला. हा तरुण वरून पडल्यानंतर जाळीत अडकल्याने त्याचे प्राण वाचले. या घटनेत तरुणाच्या डोळ्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. बापू नारायण मोकाशी, असे या तरुणाचे नाव आहे.
त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबतची निश्चित माहिती समोर आली नसली तरी प्रेमप्रकरणातून त्याने हे पाऊल उचलल्याचे समजते. या सर्व प्रकारामुळे काही काळ Ministry building मंत्रालय परिसरात गोंधळ उडाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येचा प्रयत्न कराणारा हा तरुण मानसिक रुग्ण असल्याचे समोर आले आहे. त्याने प्रेम प्रकरणातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. या तरुणाने यावेळी आपल्या घरच्यांवरही आरोप केले आहेत. माझ्या प्रेयसीवर बलात्कार झाला. मी याबाबत उद्धव ठाकरे यांना चार पत्रे पाठवली. मात्र, काहीच करण्यात आले नाही, असा दावा त्याने केला आहे.
News - Rajy