महत्वाच्या बातम्या

  सायकल रॅली काढून राष्ट्रीय विधी सेवा दिवस साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : राष्ट्रीय विधी सेवा दिना निमित्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 9 नोव्हेंबर रोजी सायकल रॅली काढून राष्ट्रीय विधी सेवा दिवस साजरा करण्यात आला. अस्मर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा. राजेश यांच्या हस्ते  रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरूवात करण्यात आली. सायकल रॅलीची सुरूवात जिल्हा न्यायालय पासून करण्यात आली व जिल्हा परिषद चौक, राजीव गांधी चौक, गांधी चौक, पोस्ट ऑफिस चौक मार्गे बस स्टॅंड, त्रिमुर्ती चौक व जिल्हा न्यायालय येथे सांगता करण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून विधी सेवा प्राधिकरणा मार्फत महिला, मुले, गरीब, दुर्बल तसेच गरजूंना मोफत विधी सेवा दिली जाते, मध्यस्थी तसेच राष्ट्रीय लोक अदालतीबाबत फायद्याबाबत नागरिकांना संदेश देण्यात आला. रॅलीत अस्मर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण राजेश न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय प्रसाद पालसिंगणकर, जिल्हा न्यायाधीश-2 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी. एल. देशपांडे, मुख्य न्याय दंडाधिकारी ए. के. आवारी, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एन. यू. परमा, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बिजु बा. गवारे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी. पी. देशमुख, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी आर. पी. थोरे, जिल्हा न्यायालयाचे कर्मचारी, सायकल क्लबचे सदस्य व जे. एम. पटेल महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 





  Print






News - Bhandara




Related Photos