महत्वाच्या बातम्या

 सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात २२ सप्टेंबरला रक्तदान शिबिर


- नागरिकांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : सेवा संकल्प अभियान अंतर्गत सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवेचा संदेश देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे उद्या, २२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पात्र नागरिकांसह विविध शासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडायांनी केले आहे.

गरजू रुग्णांना आवश्यकतेच्या वेळी रक्त उपलब्ध व्हावे तसेच स्वेच्छा रक्तदानाबाबत जनजागृती वाढावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण तसेच प्रसूतीच्या वेळी महिलांना अनेकदा तातडीने रक्ताची आवश्यकता भासते. अशा वेळी रक्तदात्यांनी केलेले रक्तदान गरजू रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरते.

रक्तदान ही सामाजिक बांधिलकी जपणारी मानवतावादी कृती असून सेवा संकल्प अभियान च्या माध्यमातून सेवाभाव आणि लोकसहभागाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे रक्तदानासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शिबिरात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.





  Print






Related Photos