महत्वाच्या बातम्या

 प्रभाग क्र. १० मध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी दोन ट्यूबवेलच्या कामांना प्रारंभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांची पाणीपुरवठ्याची समस्या लक्षात घेऊन संतोषी माता वार्ड आणि बुद्धनगर वार्ड येथे नवीन ट्यूबवेल बोरिंगच्या कामांना सुरुवात करण्यात आली. या कामामुळे परिसरातील नागरिकांना भविष्यात पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार असून, पाणीटंचाईची समस्या कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि विविध समस्या प्राधान्याने सोडविण्याच्या उद्देशाने विकासकामे हाती घेण्यात येत आहेत. पाणीपुरवठ्याची सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या ट्यूबवेलच्या कामामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्षा अल्का वाढई, नगरसेवक सुमित (गोलू) डोहने, नगरसेविका साजिया शेख, शाहिद शेख, रिक्की कैथवास, शिवा पाल, सारिका रिंगणे, चंद्रकला पाटील, शीतल गेडाम आणि वैशाली साठे उपस्थित होते.





  Print






Related Photos