महत्वाच्या बातम्या

 लोकमत कॅम्पस क्लबतर्फे ३१ ऑक्टोबरला जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा


- शिवाजी स्टेडियमवर रंगणार स्पर्धा; अंडर-७, अंडर-११ आणि अंडर-१५ वयोगटांतील खेळाडूंना संधी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील क्रीडाकौशल्य विकसित व्हावे आणि उदयोन्मुख खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने लोकमत कॅम्पस क्लबच्या वतीने शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी भंडारा येथील शिवाजी स्टेडियमवर जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत अंडर-७, अंडर-११ आणि अंडर-१५ अशा तीन वयोगटांतील मुले व मुलींना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेमध्ये इनलाईन, बिगिनर्स आणि क्वाड या प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विविध वयोगटांतील तसेच स्केटिंगचा अनुभव असलेल्या आणि नव्याने या खेळात सहभागी होणाऱ्या खेळाडूंना आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार आहे.

२९ ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणी आवश्यक -
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी जिल्हा लोकमत कार्यालय, शिवअर्पण टॉवर, राजीव गांधी चौक, भंडारा येथे संपर्क साधता येईल. स्पर्धेच्या दिवशी सहभागी खेळाडूंनी दुपारी ४ वाजता शिवाजी स्टेडियमवर उपस्थित राहावे, असे आयोजकांनी कळविले आहे.

कॅम्पस क्लबच्या सभासदांना मोफत प्रवेश -
लोकमत कॅम्पस क्लबच्या अधिकृत सभासदांसाठी या स्पर्धेत सहभागी होण्याची सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. इतर स्पर्धकांसाठी ४०० रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, लोकमत कॅम्पस क्लबच्या २०२६-२७ या वर्षासाठी नवीन सदस्यत्व नोंदणी सुरू आहे. ४०० रुपये शुल्क भरून सदस्यत्व घेणाऱ्या नव्या सभासदांना ९९९ रुपये किमतीचे डिजिटल स्पोर्ट्स वॉच आणि कॅम्पस चॅम्प्स हे पुस्तक भेट म्हणून देण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे -
विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, त्यांना स्पर्धात्मक अनुभव मिळावा आणि त्यांच्या क्रीडागुणांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुला-मुलींनी स्पर्धेत सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्पर्धा आणि नावनोंदणीसंदर्भात अधिक माहितीसाठी ८०८७१६२३५२, ९६०४३१८२९७, ९३७३७६७९९९ आणि ९२७०२८६५९२ या संपर्क क्रमांकांवर संपर्क साधता येईल.





  Print






Related Photos