महत्वाच्या बातम्या

 लक्ष्मीनगरात तब्बल २५ घरगुती गणपती विराजमान 


- भक्तिमय वातावरण : सांस्कृतिक व सामाजिक बांधिलकीची जनजागृती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : येथील आरमोरी रोडवरील लक्ष्मीनगरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून या वार्डात तब्बल पंचवीस घरगुती गणपती विराजमान झालेत. गणेश उत्सवामुळे लक्ष्मीनगरात श्रद्धा, भक्तीमय व एकोप्याचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला पुरुष व बालगोपाळ घरोघरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेत आहेत. आलिंगन, शुभेच्छा देऊन एकमेकाबद्दल आदर सन्मान व्यक्त केला जात आहे. 

लक्ष्मीनगर वार्डात वेदप्रकाश कोल्हे, महेश तिडके, अनिल प्यारमवार, कालिदास गेडाम, प्रकाश कुनघाटकर, रामदास कोराम, समीर सुरमवार, प्रमोद चिल्वरवार, सुरेश वरगंटीवार, विनोद पोरेड्डीवार, विलास पिसे, मंगेश कोतपल्लीवार, स्वप्निल कायरकर, राकेश माटेटवार, डॉ.श्याम खंडारे, पवन धाईत, नितीन कानकाटे, शिवराज नायकवाडे, सुनील सोनटक्के, अविनाश झीलपे, विनोद खोब्रागडे, व्यंकटेश्वर देसूवार, हरिदास कोकणे, दिलीप मानुसमारे, अशोक सूत्रपवार यांच्या घरी घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना केलेली आहे.

वार्डात पूजा, अर्चा, भजन, महाप्रसाद तसेच स्नेह भोजनाचे आयोजन केले जात आहे. लक्ष्मीनगरात गणेशोत्सव या सणानिमित्ताने सांस्कृतिक व सामाजिक बांधिलकीची जनजागृती होत आहे.





  Print






Related Photos