महत्वाच्या बातम्या

 रेल्वेच्या धडकेत अनोळखी तरुणाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : रेल्वेच्या धडकेत एका अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आमगाव रेल्वे स्टेशन परिसरात घडली. ही घटना गुरुवारी २१ सायंकाळी सुमारे ६:१७ वाजताच्या दरम्यान आमगाव डीएनए स्टेशनच्या डाऊन लाईनवरील पोल क्रमांक २७४/३६ ते २७४/३४ दरम्यान उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे रुळांजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच आमगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मृत तरुणाचे वय अंदाजे ३९ वर्षे असल्याचे सांगितले जात असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

या प्रकरणी संतोष भोजराज भांडारकर वय २६, रा. पदमपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.





  Print






News - Gondia




Related Photos