पोलीस स्टेशन भामरागडच्या वतीने महिला सुरक्षा, रस्ता सुरक्षा व व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन करुन रेझींग डे सप्ताह साजरा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : ०२ जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची अधिकृत रित्या स्थापना झाली. या पार्श्वभुमीवर हा दिवस पोलीस दलाचा स्थापना दिन म्हणुन ओळखल्या जातो. या स्थापना दिनाचे औचित्य साधुन पोलीस स्टेशन भामरागड येथे जाती/जमाती अत्याचार गुन्हे, रस्ता सुरक्षा नियमन व स्वंरक्षण या विषयावर मार्गदर्शन यासारखे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
०६ जानेवारी २०२४ रोजी पोलीस स्टेशन भामरागड चे प्रभारी अधिकारी शरद मेश्राम यांचे उपस्थितीत पोलीस स्टेशन भामरागड येथे महिला सुरक्षा, रस्ता सुरक्षा व व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली भामरागड परिसरात फिरविण्यात आली होती. महिला जागृती, रस्ता सुरक्षा व व्यसनमुक्ती विषयांची विविध फलक रॅलीमध्ये लावण्यात आले होते.
सदर रॅली मध्ये पोलीस स्टेशन चे पोउपनि/संकेत नानोटी, पोउपनि/सुरज इंगळे, पोउपनि धनश्री सगणे तसेच सर्व अंमलदार तसेच पोलीस मौजा भामरागड परिसरातील जय पेरसापेन शाळा भामरागड येथिल विदयार्थी, व्यसनमुक्ती पथक व भामरागड हद्दीतील महिला सहभाग नोंदविलेला होता. रॅली ला सुरुवात करायचे अगोदर प्रभारी अधिकारी शरद मेश्राम यांचे लक्षात आले कि, रॅलीकरिता आलेले काही विदयार्थ्यांच्या पायात पादत्राणे नाही हि बाब लक्षात घेवुन ३४ मुला मुलींना पादत्राणे चे वाटप केले तसेच उपस्थित महिलांना सॅनिटरी पॅड चे वाटप केले. सर्व उपस्थित विदयार्थ्यांना/महिलांना चॉकलेट चे वाटप व चहापान ची व्यवस्था पोलीस स्टेशन भामरागड तर्फे करण्यात आले.
News - Gadchiroli