नागपूर उड्डाणपुल दुर्घटनेची चौकशी होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर :
१९ ऑक्टोबर रोजी नागपूर येथील पारडी उड्डाणपुलाचा एक भाग कोसळण्यामागील कारणांची चौकशी करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण-एनएचआयने घेतला आहे. एक उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समिती या घटनेची चौकशी करेल आणि समितीने अहवाल सादर केल्यानंतर आवश्यक ती पावले उचलली जातील, असे प्राधिकरणातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे पारडी उड्डाणपुलाचे काम मेसर्स गॅनन डंकर्ले अँड कंपनी लिमिटेड आणि मेसर्स एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड संयुक्तरीत्या करत आहे. पूर्व नागपूरच्या या निर्माणाधीन पारडी उड्डाणपुलाच्या कळमना ते एचबी टाऊन या मार्गावरील एक भाग सेगमेंट १९ ऑक्टोबरच्या रात्री ९. ३० वाजताच्या सुमारास पिलर पी ७ वरून सरकला आणि जमिनीवर पडला. पडलेल्या सेगमेंटचे दुसरे टोक अजूनही पिलर पी ८ वर आहे. तथापि, या घटनेचे कारण कळाले नसून प्रथमदर्शनी सेगमेंटच्या खाली असलेले बेअरिंग्ज खराब झाल्याने ही घटना घडल्याचा अंदाज आहे. मात्र, तज्ज्ञ तांत्रिक समितीच्या सविस्तर तपासणीनंतर नेमके कारण कळणार आहे. सध्या या पिलरच्या ठिकाणी कोणतेही काम केले जात नव्हते.  Print


News - Nagpur | Posted : 2021-10-21
Related Photos