प्रतीक्षा संपली : 'या' दिवशी प्रदर्शित होणार बहुप्रतिक्षित 'केजीएफ २' चित्रपट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
कोरोना महामारीमुळे 'केजीएफ 2' (KGF 2) चित्रपटाची रिलीज डेट सतत पुढे ढकलण्यात येत होती. प्रेक्षक मात्र या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. कारण बऱ्याच काळानंतर बहुप्रतिक्षित चित्रपट 'केजीएफ 2' ची रिलीज डेट सर्वांसमोर आली आहे. कन्नड सुपरस्टार यश याने स्वतः आपल्या ट्विटर अकाऊंटवर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. रिलीज डेट समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.
यशने सोशल मीडिया पोस्ट शेअर करून चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि रिलीज डेट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यशने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'आजच्या अनिश्चिततेमुळे आमच्या संकल्पनेला उशीर होईल. मात्र जसे वचन दिले होते, त्या प्रमाणे होईल. आम्ही 14 एप्रिल 2022 रोजी चित्रपटगृहात येणार आहोत. यशची ही पोस्ट सोशल मीडियावर येताच व्हायरल झाली आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2021-08-22Related Photos