सिरोंच्यात भव्य सकल हिंदू संमेलनाचे आयोजन


- १०० वर्षपूर्तीनिमित्त मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / सिरोंचा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संपूर्ण देशभरात विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून सकल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. याच धर्तीवर सिरोंचा शहरात उद्या शुक्रवार, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी क्रिडासंकुलात हिंदुत्ववादी संघटनांकडून भव्य सकल हिंदू संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.
या संमेलनाला अयोध्या येथील पूज्यवीर धर्मजा स्वामी, तेलंगणा येथील माजी प्राचार्य सत्यनारायण रेड्डी आणि नागपूर येथील रा. स्व. संघाचे सहप्रांत प्रचारक परीक्षित जावळे यांसारखे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
मुख्य उद्देश: सामाजिक समरसता, सनातन संस्कृतीचे जतन आणि हिंदू समाजातील जातीभेद, वर्गभेद दूर करून सर्व हिंदू समाजाला एकत्र आणणे आहे. कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वदेशी जीवनशैली आणि नागरी कर्तव्यांची भावना यावर सुद्धा भर देण्यात येणार आहे.
संकलनाची सुरुवात सकाळी ९ वाजता अय्यप्पा मंदिरापासून महिला-भगिनींच्या कलश यात्रेसह आणि भव्य बाईक रॅलीद्वारे होईल. सकाळी १० वाजता मुख्य संमेलनाची सुरुवात होईल. आयोजकांकडून शहर व तालुक्यातील सर्व हिंदू बांधवांना संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




