माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन
- सुरक्षा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थेतर्फे सांस्कृतिक महोत्सव
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील राजाराम येथील सुरक्षा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने विद्यार्थ्याचे सुप्त गुण विकसित व्हावे यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष (Ajay kankdalwar ) अजय कंकडालवार, अध्यक्ष म्हणून डॉ. सुंदर नैताम, प्रमुख अतिथी व भास्कर तलांडे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलित करून सुरू करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या वतीने शासकीय कार्यालयांना संविधानाच्या प्रस्तावना वाटण्यात आले, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना संस्थेच्या वतीने संविधानाची प्रत,शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. तसेच सैराट कन्हैया लावणी ग्रुप डान्स वडसा, महापुरुषांच्या जीवनावर आधारित नृत्य व समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. हनुमंत आकदर, संस्थेचे सचिव सौ.सुरक्षाताई आकदर, मनोज आकदर, मधुकर गोंगले, भास्कर दुर्गे यांनी सहकार्य केले. गावातील व बाहेर गावातील समस्त जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli