महत्वाच्या बातम्या

 कोरोनाच्या नवीन बी.७ व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व राज्य सरकार अलर्ट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोना विषाणूने पुन्हा थैमान घातले आहे. कोरोनाच्या नवीन बी.७ व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारसह राज्य सरकार अलर्टवर झाले आहेत.

यात दिल्लीतील आयजीआय एअरपोर्टवर विशेष खबरदारी घेतले जात आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची रँडम टेस्टिंग केले जात आहे. विमानतळावर दररोज येणाऱ्या २५ हजार प्रवाशांपैकी दोन टक्के लोकांची चाचणी आली जात आहे.

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आढळल्यावर त्यांना क्वारंटाइन करण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. जेनस्ट्रिंग्स डायग्नोस्टिक सेंटरच्या संस्थापक डॉ. गौरी अग्रवाल यांनी सांगितले की, दिल्ली विमानतळावर येणाऱ्या २५ हजार प्रवाशांपैकी ५०० प्रवाशांची रँडम टेस्टिंग केली जात आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी २४ डिसेंबरला सांगितले होते की, दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर चीन, हॉगकॉग, जापान आणि साउथ कोरियासह इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांची रँडम टेस्टिंग केले जाईल. चीनसह इतर देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही पाऊले उचलले आहेत.





  Print






News - Rajy




Related Photos