जुन्या वैमनस्यातून महिलेची हत्या : आरोपीसह सहाय्यकांना अटक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जुन्या वैमनस्यातून ४० वर्षीय श्यामकला सुखदेव किरंगे (रा. हिडदा, ता. कुरखेडा) यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्याची खळबळजनक घटना गडचिरोली तालुक्यातील मेंढा येथे ८ मे रोजी सायंकाळी घडली.
गडचिरोली पोलिसांना प्रकरण उलगडण्यात यश मिळाले असून, मुख्य आरोपीसह त्याला शस्त्र पुरवणाऱ्या आणि पळून जाण्यास मदत करणाऱ्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे.
अधिकार्यांची माहिती -
संशयित आरोपी सुदामा रामभाऊ चौधरी (३३, रा. शिरसगाव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याने श्यामकला हिच्यावर जुन्या वैमनस्यातून बदला घेण्याचा कट रचला होता.
हत्या करताच काढला पळ -
श्यामकला ही मागील तीन महिन्यांपासून मेंढा येथील अक्षय भानारकर यांच्या घरी राहात होती. ८ मे रोजी दोघांनी जेवण केल्यानंतर वाद झाला. यावेळी सुदामा चौधरीने श्यामकलावर धारदार शस्त्राने सपासप वार केले आणि घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी तपास चालवून १० मे रोजी चंद्रपुरातून आरोपीला ताब्यात घेतले.
साथीदारांनाही हिसका -
तपासादरम्यान या घटनेत अन्य दोन व्यक्तींचा सहभाग असल्याचे समोर आले. चेतन धर्माराव खोब्रागडे (२१, रा. इंदिरानगर) यांनी आरोपीला खुनासाठी शस्त्र उपलब्ध करून दिले. तसेच एका विधीसंघर्षित बालकाने आरोपीला गुन्ह्यानंतर पळून जाण्यास मदत केली. या दोघांवरही संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गडचिरोली पोलिसांनी त्वरित कारवाई करून आरोपीसह सहाय्यकांना अटक केली असून, स्थानिक समाजाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




