ताडगाव येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त शोभा यात्रा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : भामरागड तालुक्यातील ताडगाव येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्याने समस्त गावकरी लालसुभाऊ आत्राम यांचे नेतृत्वाखाली ध्वजारोहण करून जागतिक आदिवासी दिवस आनंदाने साजरा करण्यात आले. ध्वजारोहण गावातील भूमिया महारु आत्राम यांचे हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून या भागातील ऍड .बंडू आत्राम, मंगेश आत्राम, लालसू आत्राम, सूरेश आत्राम, डॉ सत्तमवाड पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक रुमाले आदि मान्यवराच्या उपस्थितीत भगवान बिरसा मुंडा यांचा प्रतिमेचा पूजन करण्यात आले. उपस्थिती मान्यवराणी आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले.
आदिवासीची परंपरा, आदिवासी हक्क, संस्कृती सांगण्यात आले. यावेळी प्रामुख्याने इरकडुम्मे चे माजी सरपंच डोलूजी आत्राम,गिलुजी आत्राम, रेखाजी आत्राम,तसेच नगरपंचायत उपाध्यक्ष विष्णू मडावी नगरसेविका कविता ताई येतामवर, तेजस्विनी ताई मडावी, गावातील प्रतिष्टीत देवा बिस्वास, सैनू आत्राम व समस्त गावकरी बांधव उपस्थित होते. त्यानंतर सर्व मान्यवर व गावकरी मिळून गावात शोभयात्रा काढण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रविण शेगम रवींद्र सादमवार,गणेश आत्राम, राहूल तलांडे, आशिष वनकर , उमेश वनकर ,प्रकाश मडावी, मलेश तलांडी, सुनील मडावी संजू आत्राम,महेश उसेंडी, सरिता आत्राम, अंजलीआत्राम वनिता, अश्विनी, व इतर सर्व मूल, मुली यांनी सहकार्य केलेत.
News - Gadchiroli




Petrol Price




