महत्वाच्या बातम्या

 केंद्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या पुर्ण कराव्या : खासदार रामदास तडस 


- खासदार रामदास तडस यांनी नियम 377 अंतर्गत उपस्थित केला मुद्दा

 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : अंगणवाडी कर्मचा-यांनी खासदार रामदास तडस यांची भेट घेऊन केन्द्र शासनाकडे प्रलंबीत असलेल्या मागण्या पुर्ण करण्याकरिता विनंती केली होती. त्या अनुषंगाने आज खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत नियम 377 अंतर्गत अंगणवाडी कर्मचा-यांचा विषय उपस्थित करुन लोकसभेचे लक्ष वेधले. केंद्र सरकारने 2018 पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मानधन वाढ केलेली नसून तब्बल चार वर्षात महागाई दुप्पट वाढली असल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन 18 हजार रुपये सेविकाला व मदतीसांना 15000 रुपये देण्यात यावी.

सुप्रीम कोर्ट यांनी दिलेल्या निर्णया प्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करण्यात यावी, तसेच अंगणवाडी कर्मचा-यांसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अंगणवाडी कार्यकर्ते विमा योजना जाहीर करून केंद्र सरकारने शासन निर्णय काढलेला आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या नाही व त्याचे लाभ अंगणवाडी कर्मचा-यांना दिलेले नाही ते त्वरित देण्यात यावे व 400 च्या वर लोकसंख्या असलेल्या मिनी अंगणवाडी केंद्राचे मोठ्या अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे ते त्वरित मोठ्या अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यात यावे अशी विनंती खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत नियम 377 अंतर्गत महिला व बालकल्याण मंत्री यांना केली.

अंगणवाडी कर्मचारी पुर्ण वेळ कार्य करीत असुन तसेच शासनाच्या विविध योजनेची अमलबजावनी नियमीत करीत असतात, इतर कर्मचा-याप्रमाणे त्यांचे कार्य असुन सुध्दा नियमीत कर्मचा-याप्रमाणे सोईसुविधा उपलब्ध नाही, अंगणवाडी कर्मचा-यांच्या रास्त मागण्या असुन मागण्या मंजुर व्हाव्या या दृष्टीकोनातुन आज लोकसभेत प्रश्न उपस्थित केला असल्याचे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.

  Print


News - Wardha
Related Photos