सिंदेवाही मार्गावर अपघात : २ जागीच ठार तर १ गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील सरडपार जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने तरुण व तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
माहितीनुसार, तरुण सुमेध अलोने (२२) रा. डोंगरगाव व तरुणी सेजल कुंभारे (१९) रा. राजोली या नवयुवकांचा जागीच मृत्यू झाला असून या मृतकाच्या सोबत असलेला अक्षय लेनगुरे हा गंभीर जखमी असल्याने ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे प्राथमिक उपचार करुन जिल्हा रुग्णालयात चंद्रपूर येथे रवाना करण्यात आले.
सदर संपूर्ण घटनेचा तपास नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण हे करीत आहेत.
News - Chandrapur | Posted : 2023-02-10