सर्वेक्षणाचे कामाकरीता २५८ अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा अधिग्रहीत
- सर्वेक्षणाचे काम करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकास नागरीकांनी सहकार्य करावे : तहसीलदार पानमंद सिंदेवाही
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : मराठा समाजाचे व खुल्या प्रवर्गाचे मागासलेपण तपासण्या साठी मा. राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या प्रश्नवलीचा सर्वक्षण्याचे काम काज युध्द प्रातळीवर २३ जानेवारी २०२४ पासुन सिंदेवाही तालुक्यात सुरु झाले असून ३१ जानेवारी २०२४ पर्यंत घरोघरी प्रगणक जाऊन सर्वे करत आहेत.
या सर्वेक्षणाचे कामाकरीता शासकीय विविध विभागातील २५८ अधिकारी, कर्मचारी याची सेवा अधिग्रहीत करण्यात आली आहे. अशी माहीती सिंदेवाही तहसीलदार तथा नोडल अधिकारी संदीप पानमंद यांनी दिली आहे. तसेच घरोघरी सर्वेक्षणाचे काम करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकास नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
News - Chandrapur