महत्वाच्या बातम्या

 भंडारा जिल्ह्यामध्ये जलसंधारण सप्ताहाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : पाणी ही अमूल्य नैसर्गिक संपत्ती असून भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारण व पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर १५ ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यान जलसंधारण दिनानिमित्त जिल्ह्यात जलसंधारण सप्ताह/अभियान राबविण्यात येणार आहे.

या बैठकीला जिल्हाधिकारी सावन कुमार, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता महेश सेलूकर, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुशांत गडकरी उपस्थित होते. या अभियानांतर्गत नागरिकांमध्ये जलसंधारणाबाबत जनजागृती करणे, पावसाच्या पाण्याचे संधारण व पुनर्भरण करणे, जलस्रोतांचे संवर्धन करणे तसेच उपलब्ध पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

जलसंधारण सप्ताहादरम्यान ग्रामपंचायत, शाळा-महाविद्यालये, शासकीय कार्यालये तसेच विविध सामाजिक संस्थांच्या सहभागातून जलसंधारणाची शपथ, जनजागृती फेरी, व्याख्याने, पोस्टर व घोषवाक्य स्पर्धा, जलस्रोत स्वच्छता, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, जलपुनर्भरणाच्या उपाययोजनांबाबत प्रबोधन आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

पावसाचे पाणी अडविणे व जिरविणे, शेततळे, बंधारे, नाला खोलीकरण, गाळ काढणे, छतावरील पावसाच्या पाण्याचे संधारण यांसारख्या उपाययोजनांबाबत नागरिक व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos