गडचिरोली : बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीविरोधात २० मे रोजी औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने (AIOCD) बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री तसेच कार्पोरेटद्वारे अव्यावसायिक स्पर्धेविरोधात २० मे २०२६ रोजी औषध विक्रेत्यांचा बंद पुकारला आहे. गडचिरोली जिल्ह्यात ४०० हुन अधिक औषध दुकानं या देशव्यापी बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी पत्रकार परिषदेत सांगितले.
१८ मे रोजी कॉम्प्लेक्स परिसरातील सर्किट हाऊस येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेला जिल्हाधक्ष देवेंद्र सोमनकर, सल्लागार समिती प्रमुख राजेश ईटनकर, माजी जिल्हाधक्ष चंद्रभान जेणेकर, महिला प्रमुख गायत्री सोमनकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कायदेशीर पार्श्वभूमी -
औषधी व्यवसाय Drugs and Cosmetics Act, १९४० आणि Rule १९४५ अंतर्गत चालतो. ऑनलाईन औषध विक्री बाबत या कायद्यात कोणतीही तरतूद नाही. केंद्र सरकारने २८ ऑगस्ट २०१८ रोजी GSR ८१७(E) अंतर्गत ऑनलाईन औषध विक्रीसंबंधी नोटिफिकेशन जारी केले; परंतु त्याचे कायद्यात रुपांतर झालेले नाही. याच पार्श्वभूमीवर देशभरात बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री सुरु आहे.
दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणी रिट पिटिशन दाखल असून, ऑनलाईन औषध विक्रीवर स्थगन मिळालेला आहे. मात्र केंद्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. कोरोना काळात GSR २२०(E) नोटिफिकेशन (२६ मार्च २०२०) अंतर्गत औषध होम डिलिव्हरीसाठी विशेष सूट दिली होती, पण कोरोना संपल्यावरही ही नोटिफिकेशन रद्द करण्यात आलेली नाही. या नोटिफिकेशनचा गैरफायदा घेऊन ऑनलाईन कंपन्या औषध विक्री करत आहेत आणि छोटे व्यावसायिक अडचणीत येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील औषधी वितरण व्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे.
पदाधिकाऱ्यांचे विधान -
पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांनी सांगितले, सरकारने आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे आम्ही आंदोलनात्मक भूमिका स्वीकारली आहे. २० मे रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. जर सरकारने योग्य तो उपाय न घेतला, तर पुढील टप्पा ठरवण्यात येईल आणि त्याचे पूर्ण जबाबदारी सरकारवर राहील.
आपत्कालीन औषध सेवा -
बंदाच्या दिवशी आपातकालीन परिस्थितीत औषध हवे असल्यास खालील संपर्क क्रमांकावर संपर्क करावा:
१. देवेंद्र सोमनकर, गडचिरोली – ९४०४१२५९२६
२. सिकंदर चौधरी, वडसा – ८९९९३६२८४४
३. मनोज पत्तीवार, आल्लापली –९४२१७२९३८४
४. प्रकाश दत्ता, मुलचेरा – ९४२१८५४८१९
५. चंद्रशेखर बुध्दे, देलनवाडी – ९४२३३४२३५१३
६. संदिप रायर्लावार, सिरोंचा –९४२१७२२९६७१
७. विपुल चन्नावार, गडचिरोली – ९४२३४२२१३०
८. रुपेश सकिनलावार, गडचिरोली –९४२०७५८८३४
९. चेतन निपाने, कुरखेडा – ९४०४८३१३३२
१०. जयश्री पुंडे, गडचिरोली – ७०२०३४१२७० / ९४०५१३२८२२
११. मनिष येमुलवार, भामरागड – ९४०४४३८३८३
१२. प्रविण येगोलपवार, अहेरी – ९८३४३१२८३३
१३. विश्वजीत हलधर, धानोरा – ७५८८७७२७४३
१४. अश्विन भांडारकर, कुरुड – ८९७५६१९२००
१५. अजय आकुलवार, असरअल्ली – ९४२३७४३३२७ / ९४२१७२२९६७१
१६. संतोष धकाते, आरमोरी – ९४२०९७३६८०
१७. जितेन्द्र निमसरकार, आष्टी – ९२८४९७५३३९
१८. संतोष गंधेशिरवार, एटापल्ली – ९४०३११६९४०
१९. दिनेश जुवारे, भेंडाळा चामोशी – ९५८८६७८५८२४२
News - Gadchiroli




Petrol Price




