धक्कादायक : तेलंगणात भाजप नेत्याला कारच्या डिक्कीत बंद करुन जिवंत जाळले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / तेलंगणा :
येथील एका भाजप नेत्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
तेलंगणाच्या मेडकजिल्ह्यात काल  मंगळवारी एका स्थानिक भाजप नेत्याला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी भाजप नेत्याला कारच्या डिक्कीमध्ये बंद केले आणि त्यानंतर कारला आग लावली. ज्यात भाजपच्या स्थानिक नेत्याचा मृत्यू झाला आहे.
व्ही. श्रीनिवास प्रसाद असे मृतक नेत्याचे नाव आहे. प्रसाद हे भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष होते. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आहे. मेडकच्या एसपी चंदना दीप्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात लोकांनी भाजप नेत्याला त्यांच्या कारमध्ये बंद करून गाडीला आग लावण्यात आली. आम्हाला नेत्याचा जळालेला मृतदेह त्याच्या कारच्या डिक्कीमध्ये सापडला आहे. प्रसाद यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
  Print


News - World | Posted : 2021-08-11Related Photos