गुजरी बाजारमध्ये सायकल स्टोर्सच्या नावाखाली अवैध्य दारूविक्री जोमात
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / देसाईगंज : देसाईगंज शहरातील गुजरी बाजारात अवैध्य दारू विक्री केली जात असून सायकल स्टोर्स च्या नावाखाली अवैध्य दारू विक्री केली जात असल्याची माहिती समोर येत आहे बातमी प्रकाशित झाल्यानंतर काही दिवस अवैध्य व्यवसाय बंद ठेऊन पुन्हा जोमात बेरोकटोक दारू विक्री सुरु असल्याने ह्या दारू विक्रेत्यास कुणाचे अभय आहे ? अशे प्रश्न समोर येऊ लागले आहे.देसाईगंज शहर ची बाजारपेठ ही गडचिरोली जिल्ह्यातील महत्वपूर्ण व मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते तसेच तालुक्यासह कुरखेडा तालुक्यातील शेतकरी सुद्धा देसाईगंज कृषी उत्पन्न बाजार समितीत आपले धान विकण्यासाठी येतात अश्यात दिवस भर थांबले राहावे असल्याने गुजरी बाजारात नाश्ता व चाहा घेण्यासाठी जात असता तिथे विकली जाणारी अवैध्य दारू च्या ते बळी पडत आहेत गुजरी बाजारात सायकल स्टोर्स च्या नावाखाली सुरु असलेल्या दारू विकत असल्याची बातमी प्रकाशित केल्यानंतर काही दिवस संबंधित दारू विक्रेत्याने दारु विक्री व्यवसाय बंद ठेवला होता । पन आता पुन्हा अवैध्य दारू विक्रीचा व्यवसाय जोमात सुरु असून कोण माझा काय करणार अश्या दमावर दारू विक्री करीत असल्याची माहिती समोर येत आहे ह्या दारू विक्रेत्याला शेवटी अभय कुणाचे आहे? कुणाच्या दमावर हा अवैध्य व्यवसाय करीत आहे? कोण त्याची पाठराखन करीत आहे? अशे अनेक प्रश्न निर्माण होत असून पुलिस विभागाने लक्ष देत ह्या दारु विक्रेत्यावर कार्यवाही करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
News - Gadchiroli