महत्वाच्या बातम्या

 नेमाडा शाळेत दप्तराविना शाळा उपक्रम : विद्यार्थ्यांचा मैदानात उत्स्फूर्त सहभाग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नेमाडा येथील विद्यार्थी ३ ऑक्टोबर २०२६ रोजी दप्तराविना शाळा या नियोजित शैक्षणिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी शाळेच्या मैदानात होते, अशीमाहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळेसंदर्भात प्रसिद्ध वृत्ताच्या अनुषंगाने विभागाने दिले आहे.

नेमाडा येथील ही शाळा इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची असून, येथे एकूण पाच विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर रोजी शाळेत दप्तराविना शाळा उपक्रम सुरूहोता. त्यामुळे त्या दिवशी विद्यार्थी वर्गखोली ऐवजी मैदानात उपक्रमात सहभागी झाले होते.

यासोबतच शाळेच्या वर्गखोल्यांच्या इमारतीची आवश्यक दुरुस्ती जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्तावित करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील प्रशासकीय कार्यवाही नियमानुसार करण्यात येईल, असे शिक्षण विभागाने नमूद केले आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित व योग्य शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात येत असून, त्यांचेशैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी आवश्यक दक्षता घेण्यात येत असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने कळविले आहे.





  Print






Related Photos