महत्वाच्या बातम्या

 आलकनार – कनेली मार्गावरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन : १.५० कोटींचा निधी मंजूर!


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / धानोरा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात दुर्गम भागातील विकासकामांना चालना मिळत आहे. नाबार्ड-३१ अंतर्गत आलकनार ते कनेली रस्त्यावरील पुलासाठी १.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या पुलामुळे पावसाळ्यात निर्माण होणारी वाहतुकीची अडचण दूर होऊन परिसरातील नागरिकांना बारमाही दळणवळणाची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष साजणजी गुंडावार, ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे, विजयजी कुमरे, जिल्हा महामंत्री डॉ. प्रकाशजी गेडाम, तालुका महामंत्री सुभाषजी धाईत, युवा नेते पवनजी येरमे, श्रीनिवासजी दुल्लमवार, नगरसेवक गटनेते संजयजी कुंडू, नगरसेवक मल्लिक बुधवानी, कालिदासजी लेंगगुरे, संतोषजी एक्का, अभिजितजी गाईन, कलिरामजी राऊत, अविनाशजी पोरेटी, प्रशांतजी राऊत, प्रशांत पेदापड्डीवार, गाव पाटील रमेशजी वालको, गाव पाटील दानचूजी तोफा, उपसरपंच शेपुजी उसेंडी यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.





  Print






Related Photos