महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली पोलीस दलाच्या माध्यमातून जिल्ह्रातील युवक-युवतींचा व आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचा दिल्ली येथे नॉर्थ-ईस्ट स्टुडन्ट फेस्टिवलमध्ये सह


- आत्मसमर्पित माओवादी सदस्य व युवक युवतींसह एकूण १८ स्पर्धकांचा दिल्ली येथील नॉर्थ-ईस्ट स्टुडन्ट महोत्सवात सहभाग, रेला नृत्यातून शांतता व एकतेचा दिला संदेश

- गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत मिळाली महोत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद आता संपूष्टात आला असून येथील दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणा­या युवक-युवतींना प्रोत्साहन देण्याकरीता व त्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळण्याकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत अनेक उपक्रम राबविले जात असतात. गडचिरोली जिल्ह्रातील आदिवासी संस्कृती, पारंपरिक कला, लोकपरंपरा आणि निसर्गाशी अतूट नाते सांगणा­या जीवनशैलीचे राष्ट्रीय स्तरावर सादरीकरण करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने प्रोजेक्ट उडानच्या माध्यमातून आत्मसमर्पित माओवादी सदस्य, जिल्ह्रातील युवक-युवतींसह एकूण १८ स्पर्धकांनी दिल्ली येथे ०४ व ०५ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित ९ व्या नॉर्थ-ईस्ट स्टुडन्ट महोत्सवात’ उत्स्फूर्त सहभाग नोंदवून गडचिरोली जिल्ह्राचा पारंपरिक वाद्यांसह रेला नृत्याचे सादरीकरण करुन महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केले.

सविस्तर वृत असे आहे की, ०४ व ०५ सप्टेंबर २०२६ रोजी दिल्ली येथे ९ व्या नॉर्थ-ईस्ट स्टुडन्ट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्रातील ०४ आत्मसमर्पित माओवादी सदस्य तसेच अनुप डान्स ग्रुपचे १४ युवक-युवती यांना दिल्ली येथील महोत्सवात सहभागी होणेकामी पाठविण्यात आले होते. सदर आयोजित ९ व्या नॉर्थ-ईस्ट स्टुडन्ट महोत्सवात गडचिरोली जिल्ह्राच्या आदिवासी संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेल्या रेला नृत्याचे पारंपरिक वाद्यांसह गडचिरोलीच्या स्पर्धकांकडून मनमोहक सादरीकरण करण्यात आले. 

आत्मसमर्पित माओवादी सदस्य व युवक-युवतींनी सादर केलेल्या या पारंपरिक नृत्याला उपस्थितांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय मंचावरील दिल्ली नॉर्थ-ईस्ट स्टुडन्ट महोत्सवात रेला नृत्य व पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्राची आदिवासी संस्कृती तसेच शांतता, एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला.

यासोबतच हिंसेचा व माओवादी विचारसरणीचा त्याग करून आत्मसमर्पण केलेल्या माओवादी सदस्यांना गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार, क्रीडा तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. पुनर्वसन प्रक्रियेचा एक भाग म्हणून आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना राष्ट्रीय स्तरावरील ९ व्या नॉर्थ-ईस्ट स्टुडन्ट महोत्सवात सहभागी होण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली. या सहभागामूळे त्यांच्या आत्मविश्वासाला बळ मिळण्यासाठी सुप्त कलागुणांना व्यासपीठ आणि समाजात सन्मानाने जगण्याची नवी दिशा मिळाली आहे. 

दिल्ली येथे आयोजित ९ व्या नॉर्थ-ईस्ट स्टुडन्ट महोत्सवात आत्मसमर्पित माओवादी सदस्य व जिल्ह्रातील युवक-युवतींनी सहभाग नोंदविल्याबद्दल पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे. यांनी कौतुक केले आहे. सदर महोत्सवामध्ये गडचिरोलीचे युवक-युवती व आत्मसमर्पित माओवादी सदस्य सहभागी झाले यासाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.





  Print






Related Photos