महत्वाच्या बातम्या

 माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी वर्षा बंगल्यावर घेतले बाप्पाचे दर्शन


- गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी व जनतेच्या सुख-समृद्धीसाठी केली प्रार्थना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थान वर्षा येथे माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बंटी भांगडिया यांच्यासमवेत भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने वर्षा निवासस्थानी विराजमान असलेल्या श्री गणरायाची डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी विधिवत पूजा-अर्चा केली. यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच जिल्ह्यातील जनतेच्या सुख, शांती व समृद्धीसाठी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना केली.

गडचिरोली जिल्ह्यात विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान व्हावी, नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात आणि जिल्ह्यातील जनतेच्या जीवनात सुख-समाधान नांदावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. जिल्ह्याच्या प्रगतीसह नागरिकांच्या कल्याणासाठी गणरायाचे आशीर्वाद लाभावेत, अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली.

या प्रसंगी चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बंटी भांगडिया यांच्यासह गडचिरोली नगरपरिषदेचे नगरसेवक सागर निंबोरकर आणि महेश प्रेमलवार उपस्थित होते.

वर्षा येथील गणरायाच्या दर्शनावेळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. उपस्थितांनी श्री गणरायाचे दर्शन घेत गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासह जनतेच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.





  Print






Related Photos