राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे राजीनामा देण्याचे संकेत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राने चांगलाच इंगा दाखवला आहे. राज्यपाल लवकरच राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
खुद्द राज्यपालांनीच पदमुक्त होण्याची शक्यता व्यक्त केल्याचे कळते आहे. त्यामुळे राष्ट्रपती काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात कोश्यारी यांनी शिवाजी महाराज जुनेपुराणे असून तरुणांनी आता नवीन आदर्श शोधले पाहिजेत, असे भयंकर विधान केले होते. कोश्यारी यांच्या या वायफळ विधानावरून राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.
आम्ही जेव्हा हायस्कूलमध्ये शिकायचो तेव्हा आमचे शिक्षक विचारायचे, तुमचा फेवरेट हीरो कोण. त्यावेळी कोणाला सुभाषचंद्र, कोणाला नेहरूजी, कोणाला गांधीजी चांगले वाटले. तुम्हाला कोणी विचारले, तुमचा फेवरेट हीरो कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे हीरो मिळतील. शिवाजी महाराज तर जुनेपुराणे झाले. मी नव्या काळाबद्दल बोलतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नितीन गडकरी हे तुमचे आताचे आदर्श आहेत असे वक्तव्य कोश्यारी यांनी केले होते.
News - Rajy