महत्वाच्या बातम्या

 कृषी सहसंचालक यांचा एक दिवस बळीराजासोबत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधि / खाबांडा : वरोरा तालुक्यातील खाबांडानजिक असणाऱ्या कोसरसार येथे २५ डिसेंबर २०२२ ला शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्या जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांशी समरस होऊन संवाद साधण्याकरीत कृषी आयुक्तालय पुणे येथील कृषी सहसंचालक किरनळ्ळी यांच्यासह कृषी उपसंचालक सराफ यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत एक दिवस बळीराजा सोबत घालविला.

खांबाडा परिसरातील लभान सराड शेतकरी उत्पादक कंपनी या कंपनीला कोसरसार येथे भेट देऊन कंपनीचे संचालक मंडळ तथा शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतीतील मूलभूत समस्या जाणून घेतले व समाधान केले. लभान सराड शेतकरी उत्पादक कंपनीची वाटचाल, शेतकरी हितार्थ स्मार्ट अंतर्गत योजना, हळद मूल्यवर्धन इ. विषयावर सविस्तरपणे शेतकऱ्यांशी चर्चा झाली. प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय चंद्रपूरचे कृषी उपसंचालक मनोहर यांनी स्मार्ट प्रकल्पाची व्याप्ती व शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत शेतकऱ्यांकरिता उपलब्ध करावयाच्या सोयी सुविधा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी भोयर यांनी कृषीविषयक विविध योजनांविषयी सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतले. 

शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून उत्पादित मालाचे मूलवर्धन करून अधिक नफा मिळवावे असे, मत किरनळ्ळी कृषी सहसंचालक, फलोत्पादन यांनी व्यक्त केले. सराफ कृषी उपसंचालक तथा पालक अधिकारी चंद्रपूर यांनी लभान सराड शेतकरी उत्पादक कंपनीची शेतकरी हितार्थ वाटचाल बघून समाधान व्यक्त केले. 

याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी प्रगती चव्हाण, कंपनीचे अध्यक्ष डॉ. राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी खोब्रागडे, लेखापाल कोसुरकर व सर्व संचालक मंडळ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डोंगरकार कृषी पर्यवेक्षक यांनी केले तर आभार प्रदर्शन वाघ कृषी सहायक यांनी केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos