महत्वाच्या बातम्या

 बर्ड फ्ल्यू आजाराबाबत काळजी घ्या : आरोग्य विभागाचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : सद्या नागपूर जिल्हयात बर्ड फल्यू (एच ५ एन. १ एव्हियन फल्यू) आजाराची लागण पक्षांमध्ये झालेली दिसत आहे. वन हेल्थ संकल्पनेनुमार आपण आपल्या कार्यक्षेत्रात पशु संवर्धन विभागाशी समन्वय साधून या संदर्भात बर्ड फ्ल्यू प्रतिबंध व नियंत्रणासाठी आरोग्य विभागामार्फत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आले आहेत. का  गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील पोल्ट्री फार्ममध्ये दररोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत होता.

त्यानंतर पशु संवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने कोंबड्यांचा मृत्यू का होत आहे, हे तपासण्यासाठी आजारी कोंबड्यांचे नमुने पुण्याच्या आणि नंतर भोपाळमधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यानंतर ४ मार्च २०२४ रोजी आलेल्या अहवालात कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची म्हणजेच एवियन इन्फ्लुएंजाची लागण झाल्याचे सिद्ध झाले.

या अनुषंगाने  जिल्हाधिकारी  योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय प्राणीजन्य आजार समितीची आढावा बैठक नुकतीच  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.

या सभेमध्ये जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. एस. वंजारी, डॉ. जे.जे. देशट्टीवार जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा,श्रीमती मोनिका धवड, अन्न व औषध प्रशासन विभाग भंडारा, डॉ. सचिन चव्हाण जिल्हा सर्वेक्षण अधिकारी जिल्हा परिषद भंडारा, डॉ. श्रीकांत आंबेकर जिल्हा साथरोग तज्ञ, जिल्हा परिषद भंडारा हे अधिकारी उपस्थित होते. या सभेमध्ये जिल्ह्यातील बर्ड फल्यू सद्यास्थितीत नियंत्रण व उपाय योजनाबाबत आढावा घेण्यात आला. बर्ड फ्ल्यूबाबत नागरिकांनी काय करावे व काय करु नये याबाबत मार्गदर्शन केले. 

- पक्षी स्त्रावासोबत संपर्क टाळा.
- पक्षी, कोंबडया यांचे पिंजरे आणि ज्या भांडयात त्यांना रोज खाणे दिले जाते अशी डिटर्जंट पावडरने धुवावी, शिल्लक उरलेल्या मासांची योग्य विल्हेवाट लावा.
- एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्षांना उघडया हाताने स्पर्श करु नका. जिल्हा विभागीय नियंत्रण कक्षास ताबडतोब कळवा.
- कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना हात पाणी व साबणाने वारंवार धुवा. स्वच्छता राखा. परिसर स्वच्छ ठेवा.
- कच्चे चिकन/चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करा. पूर्ण शिजवलेल्या (१०० डिग्री सेल्सीअस) मांसांचाच खाण्यात वापर करावा.
- सुयोग्य प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी वन विभाग / पशुसंवर्धन विभागास. कळविण्यात यावे.

हे करु नका :

- कच्चे चिकन / कच्ची अंडी खाऊ नका.
- अर्धवट शिजलेले चिकन/पक्षी, अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका.
- आजारी दिसणाऱ्या, सुस्त पडलेल्या पक्षांच्या संपर्कात येऊ नका.
- पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेऊ नका. 

असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos