महत्वाच्या बातम्या

 आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची भगवान बिरसा मुंडा जयंती उत्सवाला उपस्थिती : प्रतिमेला माल्यार्पण करून केले अभिवादन


- राणी दुर्गावती चौकात महाप्रसादाचे वितरण : बिरसा मुंडा जयंती उत्सव समितीचा उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : क्रांतीसूर्य तथा आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त बिरसा मुंडा जयंती उत्सव समिती, गडचिरोली यांच्या वतीने धानोरा रोडवरील राणी दुर्गावती चौक येथे आयोजित जयंती उत्सवात गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी उपस्थित राहून भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले व विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना महाप्रसादाचे वितरणही करण्यात आले.

या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष तथा सभापती अनिलजी कुनघाडकर, नगरपरिषद सभापती हर्षलजी गेडाम, नगरसेवक केशवजी मडावी, भूपेंद्रजी हिडामी, प्रफुल्लजी मडावी, सचिनजी मेघाम, विनयजी मडावी, अक्षयजी खांडे, अरविंदजी आत्राम, प्रितमजी धाकडे, नितीनजी कोवे, मयूर गंधेवार, आकाशजी येरमे, संजयजी मांडवगाडे, विक्रांतजी कोवे, गणेशजी बोगावार, अविश कांबळे, विक्की मेघाम, दिनेशजी मुरसे आणि मिथुनजी अलाम यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी केलेला संघर्ष, अन्यायाविरुद्ध उभारलेला लढा आणि देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान सदैव प्रेरणादायी आहे. त्यांच्या शौर्य, त्याग आणि विचारांचे स्मरण करून उपस्थितांनी त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले.





  Print






Related Photos