भूकंपाच्या ७.४ रिश्टर स्केलच्या तीव्र धक्क्याने मेक्सिको हादरले : त्सुनामीचा धोका


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था / मेक्सिको :
दक्षिण मेक्सिकोमध्ये भूकंपाचेव तीव्र धक्के जाणवले. भूकंपाचा झटका इतका तीव्र होता की मेक्सिको सिटीमधील इमारती हादरल्या. 7.4 रिश्टर स्केलवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपशास्त्रज्ञ आणि रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, दक्षिण मेक्सिकोमधील अकापुल्कोमध्ये सुरुवातीला 7.0 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपाच्या हादऱ्यात नुकसीनीचीही नोंद झाली आहे. अमेरिकन त्सुनामी चेतावणी प्रणालीचे म्हणणे आहे की, मेक्सिकोच्या ग्युरेरोमध्ये 7.4 तीव्रतेचा भूकंप झाल्यानंतर त्सुनामीचा धोका आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे ने भूकंपाचा केंद्रबिंदू 7.0 दिला होता. जो पूर्वीच्या 7.4 च्या अंदाजापेक्षा कमी होता. तो पृष्ठभागापासून सुमारे 12 किलोमीटर खाली धडकला, ज्यामुळे तो भूकंप आणखीन उथळला. नुकसानीची किंवा जीवितहानीची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र भूकंपाचे धक्के मेक्सिको सिटीपासून दूरपर्यंत जाणवले. यापूर्वी जून 2020 मध्ये मेक्सिकोमध्ये भूकंपाचे जोरदार हादरे बसले होते. ज्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच 30 हून अधिक इमारतींचे नुकसान झाले होते. या भूकंपाची तीव्रता देखील रिश्टर स्केलवर 7.4 मोजण्यात आली होती. भूकंपाचे धक्के जाणवताच लोकांमध्ये एकच घबराट पसरली होती. एक वर्षानंतर येथे पुन्हा 7.4 तीव्रतेच्या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
  Print


News - World | Posted : 2021-09-08


Related Photos