साकीनाका बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणे  हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.
गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं, साकीनाका येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणात आरोपीला अटक केली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू असून यात जो कुणी सहभागी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. मुख्य आरोपी पकडलाय त्याच्या कडून माहिती काढून घेऊन त्याच्यावर ही कठोर कारवाई केली जाईल. महिलांच्या बाबतीत लवकरच शक्ती ऍक्ट तयार करण्यात येईल, त्याची प्रोसेस सुरू आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2021-09-11


Related Photos