सेवा संकल्प अभियानांतर्गत भामरागडात ई-केवायसीसाठी विशेष शिबिर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत वर्धा येथे आयोजित करण्यात आलेल्या शालेय विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत लोकबिरादरी आश्रमशाळा, हेमलकसा येथील खेळाडू विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघात नागपूर विभागात प्रथम क्रमांक पटकावला. या दमदार कामगिरीच्या जोरावर या खेळाडू विद्यार्थिनींची राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
वर्धा येथील ओ. एस. जी. टेबल टेनिस अकादमी, आंबेडकर चौक येथे नुकत्याच विभागीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत नागपूर विभागातील आठ जिल्ह्यांतील संघांनी सहभाग नोंदवला होता. गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व लोकबिरादरी आश्रमशाळा, हेमलकसा येथील तीन संघांनी केले.स्पर्धेतील सामने अत्यंत चुरशीचे झाले. त्यात लोकबिरादरी आश्रमशाळेच्या १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. पहिल्या सामन्यात संघाने नागपूर ग्रामीण संघाचा पराभव करत विजयी वाटचाल सुरू केली. त्यानंतर उपांत्य फेरीत गोंदिया जिल्ह्याच्या संघावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
अंतिम सामन्यात नागपूर शहराच्या संघाविरुद्ध अत्यंत चुरशीची लढत झाली. मात्र लोकबिरादरी आश्रमशाळेच्या खेळाडू विद्यार्थिनींनी संयमी आणि दमदार खेळ करत सामना आपल्या बाजूने खेचून आणला आणि सुवर्णपदक पटकावले. या विजयी संघात सलोनी वेलादी, रिद्धी तिम्मा, दीक्षा मडावी, परी पुंगाटी आणि संगिता लेखामी या खेळाडू विद्यार्थिनींचा समावेश आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची आता राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
मुलांच्या संघांचीही उल्लेखनीय कामगिरी -
लोकबिरादरी आश्रमशाळेच्या खेळाडूंनी केवळ मुलींच्या गटातच नव्हे, तर मुलांच्या गटातही उल्लेखनीय कामगिरी केली. १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने कांस्यपदक, तर १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघानेही कांस्यपदक पटकावले. त्यामुळे या विभागीय स्पर्धेत लोकबिरादरी आश्रमशाळेच्या खेळाडूंनी एकूणच उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचे तसेच गडचिरोली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्याकडून अभिनंदन -
या उल्लेखनीय यशाबद्दल ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी सर्व प्रावीण्यप्राप्त खेळाडूंचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी अशीच उत्कृष्ट कामगिरी करावी, यासाठी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन -
लोकबिरादरी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक गिरीश कुलकर्णी, शरीफ शेख तसेच शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी टेबल टेनिस प्रशिक्षक सुनील आलामी आणि प्रावीण्यप्राप्त खेळाडू विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देत, त्यांच्या मेहनतीचे आणि क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचे कौतुक करण्यात आले. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात मिळवलेले हे यश परिसरातील इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.




Petrol Price




