महत्वाच्या बातम्या

 वाघोबाच्या चरणी आता जलधारा! आ.सुधीर मुनगंटीवारांच्या तत्परतेने बोअरवेलचा मार्ग मोकळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /  बल्लारपूर : विसापूर-कोलगाव मार्गावरील पाटणकर-हिवरे व पोहाणे परिवाराचे आराध्य दैवत असलेल्या वाघोबा मंदिर परिसरात बोअरवेल उपलब्ध करून देण्याची मागणी आता मार्गी लागली आहे. भाविक, शेतकरी तसेच आगामी धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ही मागणी करण्यात आली होती.

भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष किशोर पंदिलवार यांच्या माध्यमातून गजानन पाटणकर व जनार्धन पाटणकर यांनी राज्याचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मंदिर परिसरात बोअरवेल खोदून देण्याबाबत निवेदन सादर केले होते. या मागणीची दखल घेत आ. मुनगंटीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

या आदेशानुसार महाराष्ट्र जलवितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक शेतकरी व नागरिकांच्या उपस्थितीत मंदिर परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान बोअरवेलसाठी योग्य जागेची निश्चिती करण्यात आली असून, लवकरच खोदकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली.

मंदिर परिसरात पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने भाविकांसह परिसरातील शेतकऱ्यांची पाण्याची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे. मागणीची तातडीने दखल घेऊन कार्यवाही केल्याबद्दल पाटणकर परिवार, शेतकरी व नागरिकांनी सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले.





  Print






Related Photos