हयात प्रमाणपत्रासाठी बल्लारपुरात विशेष शिबिर : लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ऑनलाइन हयात (DLC) प्रमाणपत्र सादर केलेले नाही, अशा लाभार्थ्यांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात लाभार्थ्यांनी उपस्थित राहून ऑनलाइन हयात प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार, श्रीमती रेणुका कोकाटे बल्लारपूर यांच्याकडून करण्यात आले आहे.
हे विशेष शिबिर २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता बल्लारपूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय, बल्लारपूर सभागृह येथे आयोजित करण्यात आले आहे.विशेषत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच इतर शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने शिबिराला उपस्थित राहून ऑनलाइन हयात प्रमाणपत्र काढून घ्यावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
हयात प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेऊन आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




Petrol Price




